राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे संकेत शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Rathod) यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे भाजप-मनसे यांच्या युतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राज्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विटरद्वारे मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना टोला लगावला आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी सांगत आह, असा आरोप काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर केला होता. येत्या 1 मार्चला विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. सध्या राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आला आहे. त्याचे नाव ‘विधीमंडळ कोरोना’ असे आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करायचा आहे, त्यामुळे सरकार कोरोना आकडेवारी वाढवून सांगत आहे, असा आरोप देशपांडे यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER