… आता अभिनय क्षेत्रात नशीब आजमवा; रूपाली चाकणकरांचा नवनीत राणांना टोमणा

Rupali Chakankar slams Navneet Rana

पुणे : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवले, त्यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना टोमणा मारला – राजकारण सोडून अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमवा.

ही बातमी पण वाचा:- नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द; खासदारकी धोक्यात

चाकणकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला – नवनीत राणा यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी खासदारकीचा तातडीने राजीनामा द्यायला हवा. यानंतर त्यांनी राजकारण सोडून अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं.

नवनीत राणा यांना अजूनही रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक समजलेला नाही. अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेची नवनीत राणा यांनी फसवणूक केली आहे. चित्रपटात तुम्हाला रिटेकची संधी असते. मात्र, अमरावतीची जनता नवनीत राणा यांना रिटेकची संधी देणार नाही, असे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राजकारणात येण्याआधी नवनीत राणा यांनी काही चित्रपटांत अभिनय केला आहे.

ही बातमी पण वाचा:- माझी शिवसेनेसोबतची राजकीय लढाई सुरु राहील  ; नवनीत राणा  कडाडल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button