एकीकडे मोदीजींकडून महाराष्ट्राचे कौतुक तर दुसरीकडे प्रवीण दरेकर यांना महाराष्ट्रद्वेषाने पछाडले : रूपाली चाकणकर

मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्र सरकारचे कौतुक करतील, अशी शक्यताच फेटाळून लावली . यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

“एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत, आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्रद्वेषाने एवढे पछाडले आहे की त्यांना काय आरोप करावे याचेसुद्धा भान राहिलेले नाहीये. ” अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button