घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्राला टोला

Rupali Chakankar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून निशाणा साधला आहे . घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, अशी टीका चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) केली आहे.

ही बातमी पण वाचा:- PMCares फंडचे व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी ‘दोनों फेल हैं; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा 

रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की , घरात नाही दाणा, पण मला “व्हॅक्सिन गुरू” म्हणा. भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button