रूपलने मारली यशोमानला टांग

आवड असली की सवड होते असं म्हणतात. किंवा मनात जर इच्छा असेल तर आपण कधीही कुठेही उठून जाऊ शकतो. पण जर इच्छा नसेल किंवा मूड नसेल प्रत्येकाकडे त्याची त्याची अशी खास कारणं असतात. मित्रांच्या कट्ट्यावर याला या कारणांना टांग मारणं असं म्हटलं जातं. अभिनेत्री रुपल नंद हिने यशोमान आपटेलाही अशीच टांग मारली. हा किस्सा जेव्हा रूपलने यशोमान याच्यासमोरच सांगितला तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासारखे होते. पण त्यानंतर मात्र ही दोघं खळखळून हसली.

रुपल नंद आणि यशोमान आपटे ही जोडी सध्या श्रीमंताघरची सून या मालिकेमध्ये दिसत आहे. सर्वसामान्य घरातील मुलगा आणि गर्भश्रीमंत घरातील मुलगी हे मैत्रीच्या पलीकडे त्यांचं नातं निर्माण करायला पाहतात. पण त्यांच्या घरच्यांचा त्यांच्या मैत्रीला किंवा त्यांच्या नात्याला विरोध नसतो तर दोन वेगवेगळ्या कौटुंबिक स्तरातील मुलगा व मुलगी जोडीदार म्हणून सुखी होऊ शकत नाहीत या कारणाने त्यांच्या लग्नाला विरोध होत असतो. या कथाबीजावर सध्या ही मालिका गाजत आहे.

मालिकेत या या दोघांनी पळून जाऊन लग्न केल्याच्या वळणावर सध्या ही मालिका आली आहे. यापूर्वी आनंदी हे जग सारे या मालिकेत यशोमानआणि रुपलची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. तसेच फुलपाखरूया यशोमनच्या पहिल्या मालिकेत रुपलची एन्ट्री जरी उशीराने झाली असली तरी या दोघांची छान मैत्री झाली आहे. श्रीमंताघरची सून या मालिकेच्या सेटवर गप्पा मारत असताना यशोमन आणि रूपल यांच्यात एक असा विषय निघाला की आपल्याला एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण कट्टा टाकायला बोलावते आणि आपल्याला जर त्या वेळेला मूड नसेल आणि जायचं असेल तर आपण काहीतरी कारण देतो. एकदा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप सोबत असताना यशोमानने रूपलनेही त्यांना जॉइन करावं असा मेसेज केला पण त्या वेळेला रुपलचा मूड नव्हता आणि तिने तब्येत बरी नाही हे ठेवणीतलं कारण सांगत टांग मारली. अर्थात त्यावेळी यशोमानल ते कारण पटलं पण रूपलने मात्र यशोमानला टांग मारली होती हे त्याला नंतर कळलं.

एकदा यशोमन आणि रूपल याच विषयावर सेट वर चर्चा करत होते. या चर्चेचा विषय असा होता की अनेकदा आपल्याला कोणीतरी मित्र-मैत्रिणी बोलवतं पण आपल्याला त्या वेळेला जायचं असेल तर आपण तब्येत बरी नाही असं सांगून रिकामे होतो. तब्येत बरी नाही हे कारण इतकं पटण्यासारखा असतं आणि मग त्यानंतर आपल्याला फार कोणी आग्रही करत नाही. तर अशी काही कारणं या दोघांनी एकमेकांच्या मित्राला किंवा मित्र-मैत्रिणींना कधी दिली आहेत का या विषयावर त्यांच्या गप्पा सुरू होत्या. त्यावेळी रुपलने उत्तर देत ,मी तुलाच टांग मारली आहे असे सांगताच यशोमानच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले.

रुपल सांगते, एकदा यशोमानचा सीन संपला होता म्हणून तर त्याने लवकर सुट्टी घेतली आणि आमच्या कॉमन मित्र-मैत्रिणींबरोबर कॉफी शॉपमध्ये गेला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की माझंही काम संपलं असेल आणि मी फ्री असेल म्हणून त्याने मला फोन केला आणि ते ज्या ठिकाणी कॉफी शॉप मध्ये गेले होते त्या ठिकाणी त्याने मला यायला सांगितलं. पण मला खरंच खूप कंटाळा आला होता आणि माझा मूड नव्हता. पण याचा अर्थ असा नव्हे की माझी तब्येत बरी नव्हती. पण मी त्या वेळेस सांगितलं की नाही मला जरा बरं वाटत नाही त्यामुळे मी येऊ शकणार नाही. त्यालाही वाटलं की मी थकले असेन आणि त्यामुळे थोडीशी तब्येत बिघडली असेल त्यामुळे त्याने मला फार आग्रह केला नाही. पण अशा प्रकारची कारण आपण कधी दिली आहेत का यावर गप्पा मारत असतानाच मी अशाच पद्धतीचे कारण तुलाच देऊन टांग मारली आहे असे सांगताच यशोमान खूप हसला.

यशोमान आपटे याने फुलपाखरू या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेतील त्याने रंगवलेली चॉकलेट बॉय ही प्रतिमा चांगलीच यशस्वी झाली. रुपल नंद ही गोठ या मालिकेतून छोट्या पडद्यावर दाखल झाली. या मालिकेत राधा ही व्यक्तिरेखा तिने साकारली होती. त्यानंतर ही जोडी नायक-नायिका म्हणून नव्हे तर सहकलाकार म्हणून फुलपाखरू या मालिकेत दिसली. अर्थात फुलपाखरू या मालिकेत रुप लची भूमिका ही एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलीची होती त्यामुळे या मालिकेत त्यांची खुन्नस त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाली.

आनंदी हे जग सारे या मालिकेतही ही जोडी एकत्र होती पण यशोमानची या मालिकेत खूप उशिरा इंट्री झाली आणि त्यानंतर ही मालिका संपली. सध्या श्रीमंताघरची सून या मालिकेत दोघंही एकत्र काम करत आहेत आणि यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. रुपल ही अभिनयाबरोबरच एक डेंस्टिस्टदेखील आहे तर यशोमान हा उत्तम गिटार वाजवतो तसेच त्याला गाण्याचीही आवड आहे. काही दिवसांपूर्वीच संपलेल्या सिंगिंग स्टार या रियालिटी शोमध्ये यशोमानने एकसे एक गाणी सादर करत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. श्रीमंत घरची सून या मालिकेत यशोमन आणि श्रीमंत घरची सून या मालिकेच्या सेटवर यशोमान आणि रुपल कॅमेरात प्रचंड धमाल करत असतात. त्यातलाच हा किस्सा खूप व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER