चित्रपटसृष्टीत अमलीपदार्थांचा वापर : महिलांच्या अपमानाबाबत मुंबई पोलीस शांत का ? – रूपा गांगुली

Mumbai Police-Rupa Ganguly .jpg

दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या (Sushant Singh Rajput death case) तपासात चित्रपटसृष्टीत अमलीपदार्थांचा वापर हा विषय पुढे आल्यानंतर यात अनेक नामवंत कलाकारांची नावे येत आहेत. सोबतच चित्रपटसृष्टीत महिलांशी अपमानास्पद व्यवहार होतो, अशाही तक्रारी येत आहेत. यावरून अभिनेत्री रूपा गांगुली (Rupa Ganguly) यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली आहे – चित्रपटसृष्टीत अमलीपदार्थांचा वापर, महिलांच्या अपमानाबाबत मुंबई पोलीस शांत का ?

एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की – बॉलिवूडने अनेकांना ड्रग्सच्या व्यसनाची सवय लावली आहे. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत अनेकांची हत्या झाली. इथे महिलांचा अपमानदेखील केला जातो. मात्र कोणी याविषयी काहीच बोलत नाही. मुंबई पोलीस शांतपणे हे सगळे पाहात आहेत, असा संताप रूपा गांगुली यांनी व्यक्त केला.

रूपा गांगुली यांनी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवरही गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. यानंतर अनेकांनी अनुराग कश्यपला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER