नाक फुटणे / नाकातून रक्त येणे – आयुर्वेद विचार

Runny Nose & Bleeding

उन्हाळा किंवा वातावरणातील उष्णता वाढल्याने बऱ्याच जणांना नाकातून रक्त येण्याचा त्रास सुरु होतो. नाक फुटणे किंवा घोळणा फुटणे असेही म्हटल्या जाते. शरीरातील उष्णता वाढल्याने हा त्रास होतो. बऱ्याच जणांना रक्तस्त्राव चक्कर किंवा अशक्तपणाही जाणवतो. यावेळी बाह्य व आभ्यंतर उपचार खूप महत्त्वाचे व फलदायी ठरतात.

  • रक्तस्त्राव थांबविण्याकरीता दूर्वांचा रस किंवा कांद्यांचा रस दोन्ही नाकपुडीत सोडणे लगेच फलदायी चिकित्सा आहे.
  • खजूर रक्त वृद्धीकर सांगितले आहे. खजूर मनुका गरम पाण्यात भिजवून थंड झाल्यावर प्यावे. अशक्तपणा कमी होतो. तर्पण करणारे हे सरबत आहे.
  • अडुळसा पानांचा रस साखर व मधासह पोटातून घेतल्यास नासागत रक्तस्त्रावावर फायदा होतो.
  • हा व्याधी रक्तातील पित्त वाढल्याने होतो त्यामुळे विरेचन पंचकर्म खूप लाभदायक आहे. तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नक्की करावे.

आहारात कुष्मांड (पांढरा भोपळा) नक्की घ्यावा. साखरयुक्त पाणी, लोणी, ऊसाचा रस, काळ्या मनुका भिजविलेल पाणी, वाळ्याचे सरबत उपयोगी ठरते. याशिवाय जुना तांदूळ, धान्य, मूग मसूर तुर, तूप दूध, पडवळ, तांदुळजा, डाळींब, आवळा, नारळ, खडीसाखर, सौंफ, शेवगा या गोष्टी नक्की समाविष्ट कराव्या. चंदनाचा किंवा थंड पदार्थाचा कपाळावर नाकावर लेप लावावा.

साळीच्या लाह्यांचे भरडचूर्ण मध व तूप घालून खावे यामुळे लगेच ताकद येते.

ज्यांना हा त्रास वारंवार होत असेल त्यांनी पथ्यपालन करणे गरजेचे आहे. अति परीश्रमाची कामे, उन्हात फिरणे, राग क्षोभ करणे, मल मूत्र इ. नैसर्गिक वेग अडविणे, स्वेदन चिकित्सा ( स्टिम घेणे), रक्तमोक्षण, धूम्रपान मद्यपान इ. प्रकर्षाने टाळावे.

आहारात कुळथी, गुळ, वांगे, तिळ, उडद, सरसो, दही, क्षारीय पदार्थ, लसूण, विरूद्धाहार, अतितिखट आंबट खारट पदार्थ घेऊ नये.

ह्या बातम्या पण वाचा : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER