राज्य चालवणे हे ‘येड्या गबाळ्याचे’ काम नव्हे, दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Uddhav Thackeray-Raosaheb Danave

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या, तसेच अतिवृष्टीच्या काळात राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा द्यायला हवा. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ‘मी आणि माझे कुटुंब’ (Me ani maze Kutumb)असे म्हणत घरातच बसले आहेत. राज्यातील सरकारची स्थिती अमर अकबर अँथनीसारखी आहे. हे सरकार आहे का? सरकार कोण चालवतंय, निर्णय कोण घेतंय कळतंच नाही. त्यामुळे राज्य चालवणे हे ‘येड्या गबाळ्याचे’ काम नव्हे, अशा कडक शब्दांत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी राज्यातील आघाडी सरकारसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केला. शनिवारी पैठण येथे विविध विकास कामांचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

दानवे म्हणाले की, हे सरकार अमर, अकबर, अँथनीसारखे आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण ते किती जिल्ह्यात गेले आणि आताचे मुख्यमंत्री किती ठिकाणी जाऊन आले. मला सांगू नका तुम्हीच विचार करा आणि आपापल्या गावात जाऊन सांगा. मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो. मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. एकट्यालाच खातो की काय कोरोना?, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांचाच वारसा आपण चालवत आहोत, हे सिद्ध करा , अन्यथा खुर्ची सोडा ; विनायक मेटेंची उद्धव ठाकरेंवर टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER