धावपटू आसमाचा प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज घेवून ७२ किमी धावण्याचा विक्रम

Runner Assam's national flag on Republic Day

कोल्हापूर :- क्रीडानगरी कोल्हापूरची धावपटू आसमाने प्रजासत्ताकदिनाचे औचित्तसाधून हा विक्रम यशस्वी करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला. देशाचा राष्ट्रध्वज घेवून तब्बल ७२ किलोमिटर आंतर अवघ्या ९ तास २८ मिनीटात धावण्याचा अनोखा आणि अवघड विक्रम धावपटू आसमा अजमल कुरणे या रणरागिणीने केला.

वास्तविक ७२ किलोमिटर आंतर धावण्यासाठी सर्व सामान्यपणे १४ तास लागतात, पण आसमाने हे आंतर १० तासांत धावण्याचा निर्धार केला होता. मात्र प्रत्यक्षात तीने हे आंतर अवघ्या ९ तास २८ मिनीटांत पूर्ण करून ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये’ आपले नाव नोंदविले आहे. आसमा ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजची विद्यार्थीनी असून कला शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे.

मंगळवारी सकाळी ६ वाजता, कमला कॉलेजच्या प्रांगणातून तीच्या विक्रमाची सुरुवात झाली. कोल्हापूर ते जयसिंगपूर आणि तेथून परत कोल्हापूर असा मार्ग होता. प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून उपक्रमाची सुरुवात झाली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तीचे आगमन कमला कॉलेजच्या प्रांगणात होताच तीचे जंगी स्वागत करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER