‘निवडणुकांमध्ये घड्याळ चालवा’, अजितदादांकडून कार्यकर्त्यांना स्वबळाचे संकेत

NCP - Ajit Pawar

पुणे : राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागलेले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी महापालिका निवडणुकाही एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने एकला चलो चा नारा दिला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे स्वबळाचे संकेत दिले आहे. पिंपरी-चिंचवड येथे पोलीस विभागातर्फे आयोजित कार्यक्रमानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली असता अजित पवारांनी निवडणुकांमध्ये घड्याळ चालावा असे म्हणत एकप्रकारे कार्यकर्त्यांना स्वबळाचे संकेत दिले आहे.

यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महापालिका निवडणुका येत आहेत. या निवडणुकांमध्ये घड्याळ चालवा. आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर भर द्या. त्यासाठी पक्षबांधणी करा. आतापासूनच कामाला लागा, असं आवाहन अजितदादांनी केलं. दरम्यान, एकीकडे पालिका निवडणुका एकत्रित लढण्यावर अजितदादा पवार भर देत आहेत. दुसरकडे कार्यकर्त्यांना निवडणुकीत घड्याळ चालवण्याचं आवाहनही करत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

यावेळी अजित पवार यांच्या शीघ्र कोपी स्वभावाचं आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच दर्शन झालं. अजितदादांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर दादा डाफरले. अरे कामं करू की सत्कार स्वीकारत फिरू?, अशा शब्दांत अजितदादांनी सुनावलं. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. राज्य सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी 10 ते 12 गावचे ग्रामस्थ आले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजितदादांचा पारा चढला. काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकऱ्यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचं संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचं लक्षात आल्याने अजितदादांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरू केली. एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले. आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करू की सत्कार स्वीकारू? असा सवाल अजितदादांनी केला. यावेळी काही गावकरीही तिथेही होते. त्यामुळे दादांचा सत्कार करण्याचा सर्वांचा हिरमोड झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER