कोल्हापुरात लॉकडाऊनची अफवाच : सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर : जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करत नागरिकांनी मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले आहे.

जिल्ह्यात आढळून जाणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. त्याला यशही येत आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त (Corona) होणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. वाढता मृत्यू दर नियंत्रित करून तो कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात लॉकडाऊन कडक करण्यात येणार नाही, तसे कोणतेही निर्णय जिल्हा प्रशासनाने अथवा राज्य शासनाने घेतलेले नाहीत. त्याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही, यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER