२५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊनची अफवा

Rumors of another lockdown from September 25.jpg

कोरोनाची (Corona virus) साथ अजून पाहिजे तशी आटोक्यात आली नसल्याने पुन्हा लॉकडाऊनबाबत (lockdown) अफवा (Rumors) पसरू लागल्या आहेत. सोशल मीडियावर काही लोक सचित्र मॅसेज व्हायरल करत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढते आहे. एक मॅसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असून त्यात २५ सप्टेंबरपासून ४६ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) नावाने एक पत्र व्हायरल होते आहे.

या पत्रात म्हटले आहे की, २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मात्र PIB ने हा मेसेज ‘फेक’ असल्याचे सांगितले आहे. व्हायरल होत असलेले हे पत्र बनावट आहे, अशी माहिती दिली आहे.

१० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या बनावट आदेशात म्हटले आहे की, “कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि देशातील मृत्यूदर कमी करण्यासाठी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय व गृह मंत्रालय २५ सप्टेंबर, २०२० पासून ४६ दिवसांचे क़डक लॉकडाऊन लागू करणार आहे. त्यामुळे एनडीएमए जीवनाश्यक वस्तूचा साठा करून ठेवण्यासाठी ही पूर्वसूचना बजावत आहे.

प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने एका ट्विटमध्ये खुलासा केला आहे की हे पत्र बनावट आहे. लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासाठी प्राधिकरणाने कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER