माझ्या घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले ही अफवा – प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik

मुंबई :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडे पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असून या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीचा समन्स बजावल्याची चर्चा सुरू होती. प्रताप सरनाईक यांनी हा आरोप फेटाळला आहे.

टॉप समुहाला सुरक्षा रक्षकांचे कंत्राट देताना त्यातून मोठ्या प्रमाणात दलाली घेणे तसेच या समुहांतर्गत परदेशी रकमेचा गैरव्यवहार करणे, परदेशात बेकायदेशीर मालमत्ता खरेदी करणे, या संशयावरुन सक्तवसुली संचालनालयाकडून आमदार सरनाईक व त्यांचा मुलगा विहंग यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांना समन्स बजावल्याची चर्चा होती. सरनाईक यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणालेत, पाकिस्तानचा आणि माझा काहीही संबंध नाही. देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या पाकिस्तानविरोधात आयुष्यभर मी लढलो. अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार.

चौकशीला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलेला नाही. ज्यावेळी आधी समन्स बजावला होता तेव्हा मी स्वतः चौकशीला सामोरा गेलो होतो. ईडीसारख्या संस्थेला सहकार्य करणे हे मी कर्तव्य समजतो. परत बोलावले नाही, असे सरनाईक म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : ‘इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों’, कंगनाचा प्रताप सरनाईकांना टोमणा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER