आयपीएल लिलावात फ्रँचाईजींना पाळावे लागतील कोणते नियम?

rules that franchisees have to follow in IPL auction

आयपीएल 2021 (IPL 2021) साठी 18 फेब्रुवारीला चेन्नई येथे लिलाव होणार आहे. त्यासाठी आठही फ्रँचाईजींनी होमवर्क करुन तयारी केली असणार, मात्र त्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत. 61 जागांसाठी 292 खेळाडू उपलब्ध आहेत. असे सहा प्रमुख नियम (Auction Rules) आहेत.

पहिला नियम – खेळाडूंच्या खरेदीसाठी मंजूर रकमेपेक्षा अधिक रक्कम खर्च करता येणार नाही.

आयपीएल संचालन मंडळाने खेळाडूंच्या खरेदीसाठी 85 कोटींच्या निधीची मर्यादा घातली आहे. एवढ्या रकमेच्या आतच त्यांना जे काही खेळाडू आपल्या तंबूत आणायचे ते आणता येतील. यंदा ही रक्कम वाढवली जाण्याचा अंदाज होता पण तसे झालेले नाही.

या 85 कोटींपैकी आता फ्रँचाईजींकडे शिल्लक असलेला निधी उतरत्या क्रमाने असा..

किंग्ज इलेव्हन पंजाब- 53 कोटी 20 लाख
राॕयल चॕलेंजर्स बंगलौर- 35 कोटी 90 लाख
राजस्थान राॕयल्स- 34 कोटी 85 लाख
चेन्नई सुपर किंग्ज- 19 कोटी 90 लाख
मुंबई इंडियन्स- 15 कोटी 35 लाख
दिल्ली कॕपिटल्स- 12 कोटी 90 लाख
कोलकाता नाईट रायडर्स- 10 कोटी 75 लाख
सनरायजर्स हैदराबाद- 10 कोटी 75 लाख

यावरुन स्पष्टच आहे की किंग्ज इलेव्हन व आरसीबीला चांगले खेळाडू आपल्याकडे ओढायच्या जास्त संधी आहेत.

दुसरा नियम- किमान 75 टक्के निधी खर्च करावा लागणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) व आयापीएल संचालन मंडळाच्या (IPLGC) नियमानुसार फ्रँचाईजींना त्यांच्या 85 कोटींपैकी 75 टक्के रक्कम खर्च करण्याचे बंधन आहे. कुणी त्यापेक्षा कमी खर्च करत असेल तर एकूण 75 टक्के होईल एवढी रक्कम वापरता येणार नाही.

तिसरा नियम- खेळाडू राखण्यासाठी आरटीएम कार्ड (राईट टू मॕच) वापरता येणार नाही.

यंदाचा लिलाव हा मिनी लिलाव आहे. मेगा लिलाव नाही म्हणून एखाद्या खेळाडूला कायम राखण्यासाठी त्या खेळाडूसाठी लागणाऱ्या विजयी बोलीएवढी रक्कम देऊन आरटीएम कार्ड वापरता येते पण मिनी लिलाव असल्याने ते वापरता येणार नाही.

चौथा नियम- प्रत्येक संघात 25 पेक्षा अधिक आणि 18 पेक्षा कमी खेळाडू नसतील.

पाचवा नियम- प्रत्येक संघात 17 पेक्षा कमी आणि 25 पेक्षा अधिक भारतीय खेळाडू नसतील.

सहावा नियम- कोणत्याही संघात आठपेक्षा अधिक परदेशी खेळाडू नसतील.

आयपीएलसाठी मिनी लिलाव दरवर्षी होतो पण मेगा लिलाव तीन वर्षातून एकदाच होतो. मेगा लिलावाच्या आधी संघ फक्त पाचचखेळाडू कायम राखू शकतात. मिनी लिलावासाठी मात्र अशी कोणतीही मर्यादा नसते.

शिवाय मेगा लिलावात आयरटीएम कार्ड वापरता येते. ते वापरून आपल्याच संघातील एखादा खेळाडू ते पुन्हा आपल्याकडेच ठेऊ शकतात. मात्र त्यासाठी त्या खेळाडूला लिलावात मिळणारी सर्वाधिक रक्कम त्यांना मोजावी लागते. प्रत्येक संघाला कमाल तीन व किमान दोन आरटीएम कार्ड मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER