‘नियम सामान्य नागरिकांसाठी आणि तुमचा अट्टाहास’, मनसे आमदाराची खोचक टीका

Raju Patil - CM Uddhav Thackeray

ठाणे : राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिका हद्दीतील सर्व दुकाने शनिवारी आणि रविवार बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत शनिवार, रविवारी बंद राहतील. मात्र या या निर्णयावर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे. सामान्य नागरीकांवर विविध निर्बंध घातले आहेत. मात्र नियम फक्त सामन्यांनाच का? असा सवाल मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी उपस्थित केला आहे.

वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. नागरिकांना बंदी घातली जात असताना सार्वजनिक कार्यक्रमांना कशाच्या आधारे परवानगी दिली गेली आहे. पालिकेसाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER