शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर

मुंबई : राज्य सरकारकडून येत्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी (Shiv Jayanti) नियमावली जाहीर केली आहे. कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ महिन्यांपासून कोणताही सण किंवा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नाही. दरम्यान, शिवजयंती तोंडावर आल्याने गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात शिवजयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले आहेत. खालीलप्रमाणे नियम घालून देण्यात आले आहेत.

१) केवळ १० व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी

२) बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये

३) गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी.

४) मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये

4) आरोग्य उपक्रम तसेच शिबीर जनजागृती करावी

5) सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियमांचे पालन करावे

6) स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

७ ) मिरवणुकीला परवानगी नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER