रुक्ष केसांसाठी ‘बेसन’ हेअरमास्क..

रुक्ष केसांसाठी 'बेसन' हेअरमास्क..

बेसनाचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी केला जातो. पण चेहऱ्या सोबत केसही सुंदर दिसायला हवेत ना. या बदलत्या हवामानामुळे केसांमध्ये बदल होणे साहजिकच आहे आणि चमकदार, निरोगी केसांसाठी केमिकलवाले प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. यावर नैसर्गिक उपाय म्हणजे ‘बेसन’.. आपले केस कितीही रुक्ष आणि डल असले तरी बेसन यावर फायदेशीर ठरेल. बेसन मास्कने केसांच्या प्रत्येक समस्यांनी सुटकारा मिळतो.

  • बेसन आणि दहीचे मिश्रण केसांच्या मुळात लावा व अर्धा तास तसेच राहू द्या. याने केस छान मुलायम होतात.
  • बेसन आणि अंडी हे शैंपू आणि कंडिशनरप्रमाणे परिणाम देतं. दोन चमचे बेसनात एका अंड्याचा पांढरा भाग मिसळा. यात एक चमचा लिंबू आणि मध मिसळा. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. आता हा मास्क केसांच्या मुळात लावा. थोड्या वेळ वाळू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
  • २-३ चमचे बेसन घेऊन त्यात जैतूनचे तेल मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. आता ही केसांच्या मुळात लावा आणि काही वेळासाठी सोडून द्या. केस अती कोरडे पडण्यापूर्वीच कोमट पाण्याने धुऊन टाका. याने केस दाट होतात.
  • बेसनात बदाम पावडर मिसळून त्यात जरा लिंबाचा रस, मध आणि दही मिसळा. मिक्स करून हे मास्क केसांच्या मुळात लावा. थोड्यावेळ तसेच राहू द्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा अमलात आणा. आपले केस अती खराब झाले असल्यास या मिश्रणात व्हिटॅमिन इ तेलाची कॅप्सूल मिसळू शकता.याने केस मजबूत होतात.

या घरगुती मास्कने तुमच्या डोक्यावरील त्वचा स्वच्छ होईल आणि कोंड्यापासून सुटकारा मिळेल. एवढेच नाही तर दोन तोंडी केसांवर फायदेशीर असलेले हे माॅस्क तुमच्या केसांना नरम आणि चमकदार करेल.