रुचिराची झाली इच्छापूर्ती

Ruchira Jadhav

माणूस म्हटलं की इच्छा आलीच. इच्छापूर्ती झाल्याचा आनंद काही औरच असतो. आपण अनेकदा असे पाहतो, ऐकतो की ,आपल्या आवडत्या कलाकाराला भेटावं व त्याच्याशी बोलावं अशी इच्छा त्यांचे चाहते व्यक्त करत असतात .त्याचप्रमाणे एखादा प्रेक्षक जेव्हा आयुष्यामध्ये खूप मोठ्या अडचणीत असतो, त्याच्या हातात खूप कमी दिवस उरलेले असतात अशा वेळेला जेव्हा अशा चाहत्यांकडून कलाकारांनी आपल्याला भेटावे अशी इच्छा व्यक्त केली जाते तेव्हा कलाकार आपलं सारं स्टारडम विसरून त्या कलाकारांना भेटायला जात असतात. सेलिब्रिटी कलाकार नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या इच्छापूर्तीचे कारण ठरत असतात हे तर आपण पाहतो. पण चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराची इच्छा पूर्ण करून त्यांना आनंद देत असतात. असाच इच्छापूर्तीचा आनंद दिला आहे अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिला तिच्या एका चाहत्याने. आपले एक मोठं पेंटिंग केलेले पोस्टर असावं अशी इच्छा रूचिराने सोशल मीडिया पेजवर पोस्ट केली होती. तिच्या पोस्टला प्रतिसाद देत तिच्या एका पेंटर चाहत्याने स्वतःच्या हाताने तिचं एक भलं मोठं पोस्टर पेंटिंग करून तिला भेट स्वरूपात पाठवलं. रूचिराने या पेंटिंग सोबतचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत त्या चाहत्याला खूप खूप धन्यवाद दिले आहेत. बाहुबली या सिनेमातील नायिका देवसेना हिचे त्या सिनेमामध्ये एक भव्य पेंटिंग आहे.

रुचिराने बाहुबली हा सिनेमा पाहिला तेव्हा तिच्या मनात एक विचार चमकून गेला आणि तो असा होता की आपलं देखील एक भव्य दिव्य पेंटिंग असलं पाहिजे. अर्थात रुचिराला अशा पद्धतीचे फोटो शूट करून त्याची मोठी प्रिंट करून ती घरामध्ये लावता येणं सहज शक्य होतं. पण आपले पोस्टर पेंटिंगमध्येच तिला हवं होतं. अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने ती जायची तसेच काही चित्र प्रदर्शनाला जायची तिथे असलेल्या मोठमोठ्या पेंटिंगचा प्रेम बघून तिच्या मनातील ही इच्छा काही केल्या तिला स्वस्थ बसू देत नव्हती. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडिया पेजवर इच्छा बोलून दाखवली. आता सेलिब्रिटी कलाकारांचं सोशल मीडिया पेज हे अनेक प्रेक्षक व चाहते पहात असतात. त्यावर कमेंट करत असतात. त्यामुळे रूचिराची ही इच्छा एका चाहत्याच्या वाचनात आली आणि त्याने लगेच रंग आणि ब्रश घेऊन रुचिराचे पोस्टर बनवायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच हे पोस्टर रुचिराच्या हातात मिळालं आणि मग त्यानंतर मात्र तिने सोशल मीडिया वरची कमेंट शोधत त्या खास चाहत्यांचे आभार मानले आहेत.

जवळपास साडेतीन ते चार वर्ष ज्या मालिकेने मराठी प्रेक्षकांवर गारुड केलं ती माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका काही दिवसांपूर्वीच संपली. या मालिकेत नायक म्हणा किंवा खलनायक म्हणा गुरुनाथ सुभेदार यांची तिसरी गर्लफ्रेंड म्हणून माया ही व्यक्तिरेखा पडद्यावर झळकली आणि ती व्यक्तिरेखा साकारली होती रुचिरा जाधव हिने. यापूर्वी रुचिराने अनेक नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे पण या मालिकेच्या लोकप्रियतेचा फायदा रूचिराच्या करिअरलादेखील नक्कीच झाला. रुचिरा हे पात्र सुरुवातीला जरी दोघात तिसरी निमित्ताने आले असले तरी या मालिकेच्या शेवटापर्यंत रुचिराने खलनायिका साकारूनही तिचा एक चाहतावर्ग निर्माण केला होता. मालिका संपली तेव्हा राधिका आणि शनाया यांच्यासोबत गुरुनाथला धडा शिकवण्यात माया हे पात्र देखील आघाडीवर होतं. खरे तर ही मालिका सुरू झाल्यानंतर जवळपास अडीच ते तीन वर्षांनी माया या पात्राचा या मालिकेत शिरकाव झाला असताना उशिरानेही ही भूमिका उत्तम साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं.

रुचिरा जितकी अभिनय क्षेत्रात सक्रिय असते तितकी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. विविध कारणाने ती फोटो शूट करून हे सगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

या खास पेंटिंग बद्दल बोलताना रुचिरा म्हणते, एखाद्या फोटो पेक्षा भव्यता असते ती पेंटिंगमध्ये मला अनेकदा असं वाटायचं की आपल्याकडे अनेक फोटो आहेत पण एक छान आणि मोठं पेंटिंग असावं. मला माझ्या घरामध्ये आवडत्या ठिकाणी ते लावता येईल. पण असं पेंटिंग मला कोण करून देईल हे काही मला समजत नव्हतं. असाच एक दिवस सहज मनात विचार आला म्हणून मी माझ्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर केली आणि माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवली. खरे तर त्यावेळेला मला अजिबात अशी अपेक्षा नव्हती की खरच कुणीतरी माझा चाहता माझ्या या इच्छापूर्तीसाठी त्याची कला सादर करेल आणि या कलेतून माझं भव्य पेंटिंग साकारेल. पण जेव्हा हे पेंटिंग त्याने मला पाठवलं तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला आणि याचीही जाणीव झाली कि आपण कलाकार म्हणून आपल्या चाहत्यांसाठी किती महत्त्वाचे असतो. त्यामुळे एक जबाबदारीही वाढली की समाजामध्ये असं काहीतरी काम केलं पाहिजे की जेणेकरून आपला आदर्श घेत असताना आपल्या चाहत्यांची देखील मान उंचावली जाईल. माझ्या चाहत्याने जे पेंटिंग केले आहे त्यामध्ये माझा मनात ज्या पद्धतीचे चित्र होतं तसंच हे पेंटिंग आहे. तसेच या पेंटिंग साठी चित्रकाराने माझ्या साडीतला फोटो वापरलेला आहे. मी जशी आहे तो प्रत्येक भाव त्याने या माझ्या पेंटिंगमध्ये उतरवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button