रा. स्व. संघ आणि संबंधित संघटनांचे कार्य सरकार बनविण्यापर्यंत मर्यादित नाही : गडकरी

Nitin Gadkari

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटनांचे कार्य हे केवळ सरकार बनवणे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनवण्यापर्यंत मर्यादित नसून राष्ट्रनिर्माणातही त्यांचे कार्य अधिक महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरींनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत थेट काहीच म्हटले नाही.

परंतु, आमच्यासाठी विचारसरणी अत्यावश्यक आहे आणि त्याहीपेक्षा वैयक्तिक संबंध गरजेचे आहेत, असे ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट बहुमतदेखील मिळाले. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती शिफारस केली. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. सध्या भाजप १०५, शिवसेनेकडे ५६ आमदार आहेत. अशात शिवसेना, राष्ट्रवादी (५४) आणि काँग्रेस (४४) एकत्रित येऊन सत्तास्थापनेचे प्रयत्न करत आहेत.

आमचं उद्दिष्ट केवळ सरकार आणणं किंवा कोणाला मुख्यमंत्री करणं नाही – गडकरी