‘राम मंदिराच्या निर्माणासाठी आवश्यक ती मदत करणार’, राज ठाकरेंचं आश्वासन

Raj Thackeray - Ram Mandir

मुंबई : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन संघाच्या सदस्यांना दिलं.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम जन्मभूमि येथे भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरासाठी देशभरातून निधी संकलनाचे काम सध्या जोरात सुरु आहे. या निधी संकलनाच्या अनुषंगानेच आज रा. स्व. संघाच्या काही सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत बोलताना आरएसएसचे सदस्य विठ्ठल कांबळे म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणासाठी सध्या देशभरातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली. यावेळी श्याम अग्रवाल, सुरेश बगेरिया, देवकिनंदन जिंदल उपस्थित होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत आवश्यक आहे. ही मदत आम्ही करु, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

दरम्यन, राज ठाकरे 1 ते 9 मार्च या कालावधीत अयोध्येत श्री रामाच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. त्यानंतर आपण अयोध्या दौऱ्याचा मानस व्यक्त केला आहे, मात्र तारीख अद्याप ठरलेली नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER