सरसंघचालकांना कोरोना; आता भिडे गुरुजींना विचारा! ; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat RSS) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडें यांच्यावर निशाणा साधला .

 मोहन भागवत यांना कोरोना झाल्याच्या बातमीला कोट करताना, अमोल मिटकरी यांनी आता भिडे गुरुजींची प्रतिक्रिया घ्या, असं ट्विट केलं आहे. अमोल मिटकरी म्हणतात, “कृपया पत्रकार बांधवांनी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!! , असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे .

दरम्यान कोरोना आणि मास्कबद्दल संभाजी भिडे यांनी नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केले होते . कोरोना हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. इतकंच नाही तर कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button