मिथुन चक्रवर्ती भाजपात जाणार? मोहन भागवतांनी घरी जाऊन घेतली भेट

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमुळे (West Bengal Assembly elections) राजकीय वातावरण तापत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज अचानक अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर मिथुन भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत .

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून, त्यामुळे भाजपा आणि तृणमूल यांच्यात राजकीय संघर्ष वाढला आहे.  याच पार्श्वभूमीवर आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने महत्त्वाची मानली जात आहे. भागवत यांच्यासोबतची भेट कौटुंबिक होती.

खूप दिवसांपासून आम्हाला भेटायचे होते; पण कार्यक्रमामुळे भेटता येत नव्हतं. भागवत यांनी आज माझ्या घरी नाश्ता केला. त्याचबरोबर मलाही सहकुटुंब नागपूरला बोलावले आहे, असे म्हणत मिथुन यांनी राजकीय चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER