कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी 60 कोटी रुपये मंजूर : खा. संभाजीराजे

Sambhaji Raje Chhatrapati

कोल्हापूर : कोल्हापूरला कोविड सेंटर साठी 60 कोटी रुपये मंजूर असल्याची माहिती खा. संभाजीराजे यांनी दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी प्रशासनाला सूचना करत असतानाच शब्द दिला होता की निधी मिळवण्यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करीन, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार बैठकीनंतर लगेचच विभागीय आयुक्तांशी संपर्क केला. यावेळी कोल्हापूरसाठी 60 कोटी रुपये त्यासोबतच सांगली, सोलापूर, आणि सातारा जिल्ह्यांची मागणी होती ती सुद्धा मंजूर झाल्याचे सांगितले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचनाही दिल्या असून निविदेची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अधिवेशन झाल्यावर 4 ते 5 दिवसात निधी वर्ग होईल. कोल्हापूर व एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना बाधित लोकांसाठी लवकरच अतिरिक्त सुविधा भेटतील असा विश्वास वाटतो असे, खा.संभाजीराजे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER