उदयनराजे भोसलेंनी कटोरा घेऊन जमवलेले 450 रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी मनीऑर्डरने परत पाठवले

Udayan Raje Bhosle - Maharastra Today
Udayan Raje Bhosle - Maharastra Today

मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर लॉकडाऊनविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले होते. या भीक मांगो आंदोलनाच्या माध्यमातून गोळा करुन दिलेले पैसे सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परत केले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनीऑर्डर करुन उदयनराजे भोसले यांना 450 रुपये परत केले.

काही दिवसांपूर्वी पोवई नाक्यावर उदयनराजे फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते. यावेळी लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम 450 रुपये इतकी होती. हे पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button