११ कोटी लसीसाठी केंद्राकडून १,७३२.५० कोटी रुपये मिळाले; आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

Adar Poonawalla

नवी दिल्ली :- सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड लसीची निर्मिती केली जात आहे. लसीच्या निर्मितीबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोविड-१९ लस उत्पादकांना सरकारने दिलेल्या ऑर्डरबाबत परस्परविरोधी अहवाल आणि वादादरम्यान त्यांनी सोमवारी कंपनीला ११ कोटी डोसची ऑर्डर मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘आम्हाला आतापर्यंत २६ कोटी डोसची ऑर्डर मिळाली असून त्यापैकी १५ कोटींहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत. भारत सरकारकडून मे, जून आणि जुलै महिन्याच्या ११ कोटी डोससाठी १,७३२.५० कोटी रुपयांची १०० टक्के आगाऊ रक्कमही मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात ११ कोटी डोस राज्य आणि खासगी रुग्णालयांत पुरवण्यात येतील.’ अशी माहिती पूनावाला यांनी एका प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

‘लसीचं उत्पादन करणं ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीत उत्पादन वाढणं शक्य नाही. तसंच भारताची लोकसंख्याही मोठी आहे. सर्व लोकांसाठी पुरेसे डोस तयार करणं सोपं काम नाही. तुलनेने कमी लोकसंख्या असलेले अगदी मोठे प्रगत देश आणि कंपन्याही यासाठी संघर्ष करत असल्याचं आदर पूनावाला यांनी सांगितलं.

Latter Adar Poonawalla

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button