कापसाच्या चुकाऱ्यासाठी पणन महासंघाला दीड हजार कोटींची थकहमी

Cotton

मुंबई : किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकर्‍यांना वेळेत देता यावेत यासाठी राज्य सहकारी कापूस(Cotton) उत्पादक पणन महासंघ घेत असलेल्या १५०० कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यासाठी पणन महासंघ बँक ऑफ महाराष्ट्रकडून ६. ३५ टक्के व्याजाने १५०० कोटी (Rs 1,500 crore)रुपयांचे कर्ज घेणार आहे. या कर्जाला हमी देण्याला मंत्रिमंडळाने संमती दिली. हमीसाठी द्यावे लागणारे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. २०२०२ – २१ च्या हंगामासाठी केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५५१५ तर लांब धाग्याच्या कापसाला ५८२५ प्रति क्विंटल हमी दर निश्‍चित केला आहे.

राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्याने खुल्या बाजारातील कापसाचे दर कमी झाले आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने हमी भावात वाढ केल्याने कापूस पणन महासंघास या हंगामात मागील हंगामापेक्षा मोठ्या प्रमाणात कापसाची हमी भावाने खरेदी करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER