उत्तरप्रदेशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी किमान १०० कोटी रुपयांचे फंडिग – ईडी

Hathras Gang Rape-ED

लखनऊ : हाथरस येथील सामूहिक  बलात्कार (Hathras Gang Rape) व पीडितेला मारल्याच्या घटनेने संपूर्ण देश संतापून उठला असतानाच आता या मुलीला न्याय मिळवून देण्याच्या नावावर उत्तरप्रदेशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी हवाल्याने १०० कोटी रुपयांचे फंडिंग (Fund Rs 100 Cr) झाल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी दिली आहे. ईडीचे (ED)अधिकारी काही संशयितांचा मागोवा घेत आहेत आणि मुलीला न्याय देण्याच्या घटनेचा वापर परदेशी निधीसाठी गेटवे म्हणून वापरण्यात आले होते की नाही याची तपासणी करण्यासाठी “जस्टिस फॉर हाथरस” या काळ्या यादीतील वेबसाईटशी संबंधित डेटा तपासून पाहात आहेत.

ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते त्यांची खातीही स्कॅन केली जात आहेत. वेबसाईटच्या प्रशासकांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची ईडीची योजना आहे. दरम्यान, कोणाचेही नाव न घेता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी म्हटले होते की, “संघटनांचा एक गट” जातीय संघर्ष घडवून आपल्या सरकारच्या विकासाचा अजेंडा रोखण्यासाठी षडयंत्र रचण्यासाठी परकीय निधी वापरत आहेत.”

यासंबंधी अधिकची माहिती म्हणजे –

पोलिसांनी सोमवारी रात्री मथुरेतील मांट टोल प्लाजावर चौघांना कलम १५१ अंतर्गत अटक केली. ईडी या प्रकरणाचा तपास करेल, आतापर्यंत १०० कोटींपेक्षा जास्त फंडिंगचा खुलासा झाला आहे. उत्तरप्रदेशातील मथुरेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या  (PFI)  चार कार्यकर्त्यांना अटक झाली. बुधवारी मांट पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, अतीक उर रहमान, आलम, सिद्दीक आणि मसूदकडून अटकेदरम्यान सहा  स्मार्टफोन, एक लॅपटॉप आणि ‘जस्टिस फॉर हाथरस विक्टिम’ नावाचे पत्रक आढळले आहे. हे चौघे दंगली पेटवण्याच्या उद्देशाने हाथरसला जात होते. सुरुवातीच्या तपासात हेदेखील समोर आले आहे की, दंगली करणे आणि पळून जाण्याच्या टिप्स  सांगणाऱ्या वेबसाईटशी या चौघांचा संबंध आहे.

या वेबसाईटला परदेशातून फंडिंग मिळते. यामुळेच आता या प्रकरणात ईडीने एंट्री केली आहे. सूत्रांनी सांगितले की, हाथरसच्या बहाण्याने जातीय दंगली घडवून आणण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला १०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे फंडिंग मिळाले आहे. यात मॉरिशसमधून ५० कोटी रुपये आले असल्याचेही सांगण्यात येत आहे. दिव्य मराठीच्या माहितीनुसार पोलीस चारही आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी करणार आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे की, हे चौघे card.co नावाची वेबसाईट चालवत होते. या वेबसाईटच्या माध्यमातून फंड गोळा करण्याचे काम सुरू होते. या फंडद्वारे दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. याशिवाय, या चौघांकडे सापडलेल्या पत्रकामध्ये  ‘ Am I not India’s daughter, made with Carrd’ अशा स्वरूपाचा मजकूर लिहिलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER