प्रभासवर लागला एक हजार कोटींचा दाव

बाहुबली (Baahubali) चित्रपटाने केवळ साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगभरात प्रभास लोकप्रिय झाला आहे. त्याच्या बाहुबलीच्या दोन्ही भागांनी एक हजार कोटींच्या वर व्यवसाय केला आहे. त्यामुळे प्रभासवर (Prabhas) पैसे लावणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रभास कथानक आणि भूमिका पाहूनच चित्रपट स्वीकारत असल्याने त्याच्याकडे भरमसाठ चित्रपट नाहीत. मात्र त्याच्याकडे फक्त तीन चित्रपट असले तरी त्यांचा एकूण खर्च एक हजार कोटी रुपयांचा आहे. हिंदीमध्ये आजवर कुठल्याही नायकाचे असे एक हजार कोटींचे तीन चित्रपट एकाच वेळी फ्लोअरवर नव्हते.

तान्हाजीमुळे लोकप्रिय झालेला दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) आणि भूषण कुमार (Bhushan Kumar) एकत्र येऊन ‘आदिपुरुष’ नावाचा चित्रपट तयार करणार आहेत. प्रभु श्रीरामांची कथा या चित्रपटात दाखवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रभास राम बनणार असून सैफ अली रावणाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे बजेट 450 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

प्रभासचा नवा ‘राधेश्याम’ चित्रपट आता पूर्णत्वाकडे जात असून या चित्रपटात त्याची नायिका पूजा हेगडे असून भाग्यश्रीही यात महत्वाची भूमिका आहे. अॅक्शन प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच परदेशात आणि हैदराबादमध्ये करण्यात आले. या चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे,

याशिवाय प्रभास आणखी एक भव्य चित्रपट करणार असून त्यात अमिताभ बच्चन यांचीही महत्वाची भूमिका आहे तर नायिकेच्या भूमिकेत दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

संपूर्ण भारतात एकाच नायकाचे एकाच वेळी फ्लोअरवर असलेल्या चित्रपटांचे बजेट एक हजार कोटी रुपये असण्याची ही पहिलीच वेळ असून यातूनच प्रभासवर निर्मात्यांचा किती विश्वास आहे ते दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER