रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये मदत तोकडी – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-CM Uddhav Thackeray

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडचे मोठे नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेली १०० कोटींची मदत अगदीच तोकडी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ही बातमी पण वाचा : दिलासा तर दिलाच, सोबत कौतुकही केले; मुख्यमंत्र्यांकडून रायगडला १०० कोटींची मदत

राज्यात भाजपाची सत्ता असताना सरकारने अशा नैसर्गिक आपत्तीवेळी भरभरून मदत केली आहे. आताची मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य केले. यावेळी सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे कौतुक केले. “मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले. जे निर्णय आपण पाहू शकणार नाही असे अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यात कलम ३७० रद्द करणे हा महत्त्वाचा निर्णय होता.” असे ते म्हणाले. “३७० रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असे बोलले जायचे. पण असे काही घडले नाही उलट काश्मीरच्या विकासाची प्रकिया सुरु झाली. ” असे त्यांनी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायदा, राम मंदिर हे केंद्र सरकारचे चांगले निर्णय असल्याचे ते म्हणाले.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER