भाजपच्या माजी नगरसेवकाच्या गाडीत सापडलेत 10 लाखांच्या जुन्या नोटा

notes-seized
Representational Pic

पुणे : भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केतकर आणि युवक आघाडीचे पदाधिकारी दीपक पोटे हे शुक्रवारी इनोव्हा कारने बारामतीला जात असताना पुण्यातील सासवड भागात पोलिसांच्या चौकशी दरम्यान कारमध्ये 10 लाखांच्या जुन्या नोटा सापडल्यात.

पोलिसांनी कारवाई केली असता, आपण हे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असल्याचं दोघांनीही पोलिसांनां सांगितलं. पोलिसांनी इनोव्हा कार ताब्यात घेतली आहे. सोबतच या प्रकरणाची आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. तसेच या पैशाचा नगरपालिका निवडनुकीशी काही संबंध तर नाही ना ? याची चौकशी सासवड पोलीस करताहेत.