धार्मिक स्थळं उघडा; राज्यभरात रिपाइंचे आंदोलन

Ramdas Athawale

मुंबई : कोरोना विषाणूचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. ही मंदिरं पुन्हा खुली करण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने राज्यभरात आंदोलन केले आहे .आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या नेतृत्वात मुंबई येथील चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) आंदोलन करण्यात आले .

“मंदिर, मस्जिद, चैत्यभूमी हे सगळं उघडलं पाहिजे. अनलॉक सुरू झालं आहे. गाड्या, ऑफिसेस सुरू झाली. मग धार्मिक स्थळं का उघडली नाहीत? पोलीस बंदोबस्तात त्यांना उघडायला परवानगी द्यावी. मंदिराला परवानगी दिल्याने कोरोना वाढणार नाही. काल राज्यभर आम्ही आंदोलनं केली आहेत, आज चैत्यभूमीवर आंदोलन केले. लवकरात लवकर चैत्यभूमी उघडतील ही अपेक्षा आहे.” अशी मागणी आठवले यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER