अभिनेत्री कंगना राणावतच्या रक्षणासाठी आज मुंबई विमानतळावर रिपाइं कार्यकर्ते सज्ज राहणार – रामदास आठवले

कंगनाच्या घराला ही रिपाइं कार्यकर्ते संरक्षण देणार

Ramdas Athawale - Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) या बुधवार दि 9 सप्टेंबर रोजी मुंबईत (Mumbai) येत आहेत. त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संरक्षण देण्यासाठी रिपाइं चे कार्यकर्ते निळे झेंडे घेऊन मुंबई विमानतळ (Mumbai Airport) येथे दुपारी 12 वाजल्यापासून सज्ज राहतील. तसेच कंगना राणावत यांच्या घराला ही रिपाइं कार्यकर्ते संरक्षण देतील.असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.

कंगना राणावत यांनी नुकताच ना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून आपण महाराष्ट्राची भक्त असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे कंगना ला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेने ने आता करू नये. अभिनेत्री महिला असणाऱ्या कंगणाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे.भारतीय राज्य घटने ने सर्वांना विचारस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कंगना च्या संरक्षणासाठी उद्या दि. 9 सप्टेंबर रोजी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; जिल्हा अध्यक्ष विवेक पवार ; सिद्धार्थ कासारे; किशोर मासुम यांच्या नेतृत्वात रिपाइं कार्यकर्ते मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सज्ज राहणार आहेत अशी माहिती रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER