रेल्वेने अवैध सॉफ्टवेअरचा नायनाट करून 60 दलालांना अटक केल्याने तात्काळ तिकीटांचा घोळ संपणार

Tatkal Ticket

नवी दिल्ली : रेल्वेने अवैध सॉफ्टवेअरचा पूर्ण सफाया करत एकूण 60 दलालांना अटक केली आहे. रेल्वेने केलेल्या या कारवाईनंतर आता प्रवाशांना मुबलक प्रमाणात तिकीटे उपलब्ध होणार असून आता प्रवाशांना अनके तासानंतरही आता तात्काळ तिकीटे मिळू शकणार आहेत.

अचानक प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने तत्काळ सेवा सुरू केली होती. मात्र दलालांमुळे तत्काळ तिकीट दोन मिनिटांतच संपून जात होते. हे लक्षात घेत आरपीएफने कडक धोरण अवलंबले आहे.

कल्याण-डोंबिवतीतील 27 गावांची वेगळी नगरपालिका करण्यास भाजप, शिवसेना नगरसेवकांचा विरोध

अटक करण्यात आलेल्या कोलकत्यातील एका दलालाचा संपर्क बांगलादेशातील दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिद्दीन असल्याचा संशय आहे. ई-तिकिट घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला असून याचा याचे संबंध दहशतवाद्यांशी असण्याची शक्यता असल्याचे जानेवारी महिन्यात रेल्वेच्या महासंचालकांनी सांगितले होते.

एएनएमएस, मॅक आणि जग्वारसारख्या अवैध सॉफ्टवेअर आयआरसीटीसीचे लॉगइन कॅप्चा, बुकिंग कॅप्चा आणि बँक ओटीपी बायपास करत असतात. खरे पाहता ग्राहकांना या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार आहे. एका सर्वसामान्य ग्राहकांसाठी बुकिंग प्रक्रियेसाठी सुमारे २.५५ मिनिटे लागतात. मात्र, असा अशा सॉफ्टवेअरचा वापर करणारे ही प्रक्रिया १.४८ मिनिटांत पूर्ण करतात असे अधिकारी म्हणाला.

रेल्वे दलालांना तत्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी देत नाही.याच सॉफ्टवेअरद्वारे दलाल ते तिकिटं बुक करत होते. याच कारणामुळे सर्वसामान्यांना तिकीट बुकींगमध्ये अडथळा येत होता. आता अवैध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एकही तिकीट बुक केले जात नाही. रेल्वेने कारवाईदरम्यान सॉफ्टवेअरच्या प्रमुख ऑपरेटर्सनाही पकडले आहे. या कारवाईदरम्यान हे सॉफ्टवेअर ब्लॉक करण्यात आली आहेत. ही सॉफ्टवेअर वर्षाला ५० ते १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करत होती.