रॉयल एनफिल्डचा गोव्यात होणार मेगा शो

- जगभरातील बुलेटचालकांचा समावेश

royal

मुंबई :- रॉयल एनफिल्ड अर्थात बुलेट, म्हणजे जोशाची, उत्साहाची, तारुण्याची आणि सळसळत्या रक्ताची सवारी. बुलेट चालवणे हा एखाद्या महाराजाने आकर्षक घोड्यावर बसण्यासारखे असते. याच एनफिल्डचा एक मेगा शो गोव्यात होत आहे.

रॉयल एनफिल्‍डने उत्‍साहींना एकत्र आणणा-या जगातील सर्वात मोठ्या संमेलनाचे गोव्‍यामध्‍ये २२ ते २४ नोव्‍हेंबर २०१९ दरम्‍यान आयोजन केले आहे. रॉयल एनफिल्‍डचा हा वार्षिक मोटरसायकलिंग व संगीत महोत्‍सव ‘राइडर मॅनिया २०१९’ यानिमित्ताने परतला आहे. गोव्‍याच्‍या आकर्षक समुद्रकिना-यांवर म्‍युझिक, मेट्स आणि मोटरसायकलिंगच्‍या रोमांचने भरलेल्‍या या तीन दिवसीय महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. २२ ते २४ नोव्‍हेंबरदरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या राइडर मॅनियामध्‍ये जगभरातील राइडर्स दिसणार आहेत. त्‍यांना रॉयल एनफिल्‍डचा प्रत्‍यक्ष अनुभव देण्‍यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा : जीएसटीच्या मोठया दिलाशाची अपेक्षा

राइडर मॅनिया हे जगातील रॉयल एनफिल्‍ड उत्‍साहींसाठी सर्वात मोठे संमेलन आहे. हे संमेलन रॉयल एनफिल्‍ड मालक आणि उत्‍साहींना स्‍पर्धा, तज्‍ज्ञ सत्रे, कला आणि संगीतमय मैफिलींच्‍या सिरीजचा आनंद देते. यंदा राइडर मॅनिया रॉयल एनफिल्‍डच्‍या अनुभव व उत्‍साहाला एकत्र आणण्‍याच्‍या उत्‍कट प्रयत्‍नांमध्‍ये आणखी एका पंखाची भर करणार आहे. अनेक उत्‍साही राइडर मॅनियासाठी त्‍यांचे वर्षभरातील नियोजन करतात. हे जुन्‍या मित्रांना भेटण्‍याचे, नवीन मित्र करण्‍याचे, कथा सांगण्‍याचे आणि नवीन साहसांचा अनुभव घेण्‍याचे व नियोजन करण्‍याचे स्‍थळ आहे.

‘हिमालयन ओडिसी २०१९’ दरम्‍यान सुरू झालेला स्थिरतेप्रती प्रवास कायम ठेवत राइडर मॅनिया झीरो ‘सिंगल-युज प्‍लास्टिक’ला देखील प्रबळपणे चालना देणार आहे. यंदा फेस्टिवलमध्‍ये रॉयल एनफिल्‍ड पाण्‍याच्‍या बाटल्‍यांची खरेदी व वापराच्‍या माध्‍यमातून निर्माण होणारा सिंगल-युज प्‍लास्टिकचा वापर टाळण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. यासंदर्भात सर्व नोंदणीकृत सहभागींना नोंदणीच्‍या वेळी मेटल देण्‍यात येईल आणि स्‍थळातील विविध ठिकाणी पाण्‍याच्‍या बाटल्‍या परत करण्‍याची सुविधा करण्‍यात येईल. ज्‍यामुळे प्‍लास्टिकच्‍या पाण्‍याच्‍या बाटल्‍यांची खरेदी करण्‍याची गरज कमी होईल.

तीन दिवसांच्‍या महोत्‍सवामध्‍ये राइडर मॅनियामध्‍ये उपस्थित होण्यासाठी ८००० हून अधिक रॉयल एनफिल्‍ड मालकांना एकत्र आणण्‍यासाठी विविध कार्यक्रम जगभरात होत आहेत. तसेच महोत्‍सवामध्‍ये स्थिर वातावरणाची निर्मिती करण्‍याचा लक्षणीय प्रभाव निर्माण केला जाईल.

मोटरसायकलिंग इव्‍हेण्‍ट्स व स्‍पर्धा, ट्रायल्‍स, शो रेस, आर्म रेसलिं, डर्ट ट्रॅक रेसिंग, कस्‍टम मोटरसायकल्‍स, मोटरसायकल गिअर स्‍टॉल्‍स, संगीत व मनोरंजन, राइडर मॅनिया येथील आर्ट गॅरेज कॅफे स्‍पेशल वर्कशॉप्‍स अशा नानावीध कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.