रॉयल एनफिल्ड कात टाकतेय

होतायत मोठे बदल, टच पॉइंटही वाढवणार

Royal Enfield

मुंबई :- रॉयल एनफिल्‍ड या मोटरसायकल विभागामध्‍ये जागतिक अग्रणी कंपनीने नेहमीच ग्राहकांसाठी मोटरसायकलची उपलब्‍धता वाढवली आहे. एकट्या भारतात जवळपास ९३० विद्यमान डीलर टचपॉइण्‍ट्स, ८८०० अधिक सर्व्हिस बेज आणि ९०० हून अधिक अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्‍ससह रॉयल एनफिल्‍डचे देशातील प्रीमिअम ब्रॅण्‍ड्समध्‍ये सर्वात व्‍यापक विक्री व सेवा नेटवर्क आहे. या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये भर करत रॉयल एनफिल्‍डने द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे आणि नगरांमध्‍ये २५० नवीन डीलर टचपॉइण्‍ट्सच्‍या सादरीकरणाची घोषणा केली आहे.

नवीन रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्समध्‍ये शहरांमधील विद्यमान डीलरशिप्‍स म्‍हणून काही रिटेल माहिती मिळेल. तसेच या स्‍टोअर्समध्‍ये सर्व्हिस व स्‍पेअर्सव्‍यतिरिक्‍त मोटरसायकल्‍सचा संपूर्ण पोर्टफोलिओ असेल.

कंपनीने आयकॉनिक रॉयल एनफिल्‍ड बुलेटच्‍या सहा नवीन व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या सादरीकरणाचीही घोषणा केली आहे. ही बुलेट आता १ लाख १२ हजार रुपयांपासून उपलब्‍ध असेल.

छोटी नगरे व शहरांमधून बुलेटला लक्षणीय मागणी येत आहे. यामधून विकासासाठी प्रचंड क्षमता दिसून येते. लवकरच ही छोटी शहरे मध्‍यम-वजनाच्‍या मोटरसायकल विभागासाठी एक मोठी बाजारपेठ बनतील. या शहरांमधील मोटरसायकलप्रेमींमध्‍ये आरामदायी मोटरसायकल राइडचा ट्रेण्‍ड झपाट्याने वाढत आहे. यासाठीच या नगर व शहरांमध्‍ये २५० नवीन रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्स सुरू होत आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

प्रामुख्‍याने भारतभरातील छोटी नगरे व शहरांमध्‍ये स्थित असणारे रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्स हे अद्वितीय व सुसंगत आहेत. या स्‍टोअर्समध्‍ये रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍सची संपूर्ण रेंज असेल. तसेच या स्‍टोअर्समध्‍ये सेवा, स्‍पेअर्स, मोटरसायकल्‍स अॅक्‍सेसरीज आणि अपॅरल्‍सची संपूर्ण रेंज असेल. हे स्‍टोअर्स ५०० ते ६०० चौरस फूटांवर विस्‍तृत असतील आणि विद्यमान रॉयल एनफिल्‍ड डीलरशिपसह कार्यरत असतील. ही सुसंगत स्‍टोअर्स विद्यमान ग्राहकांना विक्री व सेवा लक्षणीयरित्‍या उपलब्‍ध करून देतील आणि देशातील बाजारपेठांमधील संभाव्‍य ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करतील.

रॉयल एनफिल्‍ड बुलेट ही आयकॉनिक मोटरसायकल आहे. १९३२ पासून म्‍हणजेच गेल्‍या ८७ वर्षांपासून या मोटरसायकलचा चिरस्‍थायी प्रवास राहिला आहे. या मोटरसायकलने रॉयल एनफिल्‍डला सातत्‍यपूर्ण उत्‍पादनामधील जगाचा सर्वात जुना मोटरसायकल ब्रॅण्‍ड म्‍हणून मान दिला आहे. बुलेट ही जगामध्‍ये दीर्घकाळापासून चालवली जाणारी मोटरसायकल आहे. नवीन बुलेट मोटरसायकल्‍सचे सादरीकरण या चिरस्‍थायी प्रवासामध्‍ये आणखी एका अध्‍यायची भर करते.

नवीन बुलेट संभाव्‍य ग्राहकांना नवीन उत्‍साही, आकर्षक रंग आणि समकालीन डिझाइन थीम्‍समधील विविध पर्याय देते. बुलेट ३५० तिच्‍या विद्यमान काळ्या रंगातील व्‍हेरिएण्‍टसह आता बुलेट सिल्‍व्‍हर, सफायर ब्‍ल्‍यू आणि बुलेट ओनिक्‍स ब्‍लॅक या तीन नवीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. बुलेट ३५० ईएससध्‍याच्‍या मरून व सिल्‍व्‍हर व्‍हेरिएण्‍ट्सव्‍यतिरिक्‍त जेट ब्‍लॅक, रिगल रेड, रॉयल ब्‍ल्‍यू या रंगांमध्‍ये सादर करण्‍यात येईल. तसेच या मोटरसायकल्‍समध्‍ये आकर्षक ब्‍लॅक्‍ड आऊट थीम असेल.

मोटरसायकल्‍सच्‍या नवीन बुलेट रेंजचे सादरीकरण हे ग्राहक समाधानाच्‍या दिशेने आणखी एक लक्षणीय पाऊल आहे. रॉयल एनफिल्‍डने ‘कॉस्‍ट ऑफ ओनरशीप’सुधारण्‍यासंदर्भात एक नवीन उपक्रम सुरू करण्‍याची घोषणा केली. कंपनी आपल्‍या सर्व अधिकृत सेवा केंद्रांमध्‍ये सेवेसाठी सेमी-सिथेंटिक तेलाच्‍या नवीन मिश्रणासह प्रक्रिया व तंत्रज्ञांचा नवीन दर्जा वापरण्‍यास सुरूवात करणार आहे.