रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सला ८२ धावांनी पराभूत केले

Virat Kohli - RCB

शारजाह येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) च्या २८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध (KKR) विजय मिळवण्यासाठी १९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने निर्धारित २० षटकांत दोन गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रतिउत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून ११२ धावा केल्या आणि ८२ धावांनी पराभव पत्करावा लागला.

दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल केला. गुरकीरत मानच्या जागी बंगळुरूने मोहम्मद सिराजची तर कोलकाताने टॉम बैंटनला सुनील नारायणच्या जागी घेतले. सात सामन्यात ५ विजयांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर तर सात सामन्यात ४ विजयांसह कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER