कोल्हापुरात 23 सप्टेंबरला मराठा समाजाची गोलमेज परिषद : आमदार खासदारांचे पुतळे जाळणार

Maratha Arakshan.jpg

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात 23 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषद होणार आहे. मराठा समाजातील नेते सुरेश पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

मराठा समन्वय समितीच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात 48 खासदार आणि मराठा समाजातील 181 आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे दहन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संसदेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील 48 खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत ठराव करावा, अशी मागणी मराठा समन्वय समितीने केली आहे.

तर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यभरातील मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत. याच परिषदेमधून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

कोल्हापूरमध्ये रविवारी राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गडिंग्लज तालुक्यात सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी गोलमेज परिषदेची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबरनंतर राज्यातील 181 आमदारांचे पुतळे जाळणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER