कोल्हापुरात २ ऑक्टोबरला धनगर समाजाची गोलमेज परिषद

Dhangar Community

कोल्हापूर : धनगर समाजाला (Dhangar Community) देण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद २ ऑक्टोबरला कोल्हापूर (Kolhapur) इथं आयोजित करण्यात येणार आहे. गोलमेज परिषदेला राज्यातील धनगर समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिली.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. धनगर समाजाचा एकही लोकप्रतिनिधी लोकसभेत नाही, या समाजाच्या आरक्षणविषयी लोकसभेत कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही. परिणामी कायद्यातील त्रुटी दूर करून धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. समाजातील अनेक घटक , विद्यार्थी यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व संघटना आता एकवटल्या आहेत. सर्व संघटनाच्या प्रतिनिधी आणि समाजबांधवांची गोलमेज परिषद २ ऑक्टोबरला कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात होणार आहे. या परिषदेला समाजाचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER