रॉस टेलरला मिळाले कोणते असे गिफ्ट की वाटावे यापेक्षा धावा काढण्या तरी सोप्या!

Ross Taylor

न्यूझीलंडचा रॉस टेलर हा कसोटी, टेस्ट व टी-20 या तिन्ही प्रकारात प्रत्येकी शंभराच्यावर आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला. भारताविरुध्दच्या वेलिंग्टन कसोटीत मंगळवारी त्याने हा इतिहास घडवला. हा विशेष प्रसंग साजरा करताना त्याला सहकाऱ्यांनी मात्र असे गिफ्ट दिले की एवढे सामने खेळणे सोपे आणि त्यात धावा काढणेही सोपे पण या गिफ्टचा उपयोग करणे कठीण असे म्हणायची वेळ आली.

या विशेष प्रसंगी रॉस टेलर आपल्या कुटुंबासोबत, विशेषतः तिन्ही मुलांसोबत मैदानात आलेला होता आणि उपस्थित प्रेक्षकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. इयान स्मिथने गौरवपर भाषण दिले आणि 100 कसोटी सामने खेळलेला दूसरा एक किवी खेळाडू, ब्रेंडन मककल्लूम त्याचे अभिनंदन करण्यासाठी मैदानात उपस्थित होता.

यावेळी रॉसला सहकाऱ्यांच्या वतीने एक सुंदर टोपी भेट देण्यात आली. पण त्यासोबतच आणखी एक असे गिफ्ट देण्यात आले की धावा काढणे तरी सोपे वाटावे. या विशेष प्रसंगानिमित्त रॉसला थोडथोडक्या नव्हे तर वाईनच्या तब्बल 100 बाटल्या भेट देण्यात आल्या आणि त्या संपविणे म्हणजे निश्चितपणे यापेक्षा धावा काढणे तरी सोपे असे रॉस टेलरला वाटले असणार..नाही का!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मैलाचे टप्पे गाठणारे खेळाडू

100 कसोटी सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू – कॉलिन काऊड्रे
100 वन डे सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू – ऍलन बोर्डर
100 टी-20 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू – शोएब मलिक
आणि
कसोटी, वन डे व टी-20 चे प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू – रॉस टेलर