चार शतकांमागे रुटचे एक द्विशतक, सर्वाधिक प्रमाण कुणाचे?

Joe Root

जो रुटने (Joe Root) शतकांचा धडाका लावला आहे. गेल्या सलग तीन कसोटी सामन्यात त्याने शतकं झळकावली आहेत. त्यात दोन द्वीशतकं (Double Hundreds) आहेत आणि यासह आपल्या 100 व्या सामन्यात द्विशतक करणारा आणि 98, 99 व 100 व्या सामन्यांमध्ये शतकी खेळी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे.

कसोटी सामन्यांमध्ये जो रुटचे हे 20 वे शतक असून त्यातील 5 द्विशतकं आहेत. म्हणजे त्याच्या दर चार शतकांतील एक शतक द्विशतक आहे आणि हे प्रमाण 25 टक्के येते. त्याच्या 20 शतकांपैकी निम्मे शतकी खेळी दीडशेपेक्षा अधिक धावांच्या आहेत. याप्रकारे रुटने तीन आकडी धावसंख्या गाठली तर तो मोठी खेळी करणार हे जवळपास निश्चित असते.

एकूण शतकांमध्ये द्विशतकांच्या 25 टक्के प्रमाणासह मोठ्या खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रुट 11 व्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी अर्थातच सर डाॕन ब्रॕडमन आहेत ज्यांच्या 29 कसोटी शतकांपैकी 12 खेळी 200 पेक्षा अधिक धावांच्या आहेत. हे प्रमाण 41 टक्के आहे. दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा मार्व्हन अट्टापटू आहे. त्याच्या 16 शतकांपैकी 6 द्विशतक आहेत तर ब्रेंडन मॕक्क्युलम व झहीर अब्बास यांच्या 12 शतकांपैकी 4 द्विशतकं आहेत. म्हणजे त्यांच्या प्रत्येक तीन शतकी खेळीतील एक खेळी द्विशतकी आहे.

द्विशतकी खेळींचे सर्वाधिक प्रमाण असे-

फलंदाज —— शतकं – द्विशतकं – टक्केवारी
डॉन ब्रॕडमन ——-29 — 12 — 41.37
मार्व्हन अट्टापटू —-16 – 06 — 37.50
ब्रेंडन मॕक्क्युलम —12 – 04 – 33.33
झहिर अब्बास —–12 – 04 – 33.33
वाॕल्टर हॕमंड —– 22 – 07 – 31.81
कुमार संघकारा — 38 – 11- 28.94
ब्रायन लारा ——- 34 – 09 – 26.47
जावेद मियांदाद — 23 – 06- 26.08
विरेंद्र सेहवाग —– 23 – 06 – 26.08
विराट कोहली —– 27 – 07 – 25.92
जो रुट ———–20 – 05 – 25.00

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER