
फूटबॉल सुपरस्टार लियोनेल मेस्सी (Lionel Messi) व ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांनी जवळपास सर्व मानाचे पुरस्कार जिंकले आहेत पण एक पुरस्कार असा आहे जो मेस्सीला आतापर्यंत एकदासुध्दा मिळाला नाही आणि आता रोनाल्डोला तो पुरस्कार मिळालाय.
रोनाल्डोला ह्याच्याआधी सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा बॕलोन डी’ओर पुरस्कार पाच वेळा, चॕम्पियन्स लीग पदक पाच वेळा, चार वेळा युरोपियन गोल्डन शू आणि सात प्रमुख युरोपियन लीग विजेतेपदं मिळाली आहेत. आता त्यात ‘गोल्डन फूट’ (Golden Foot award) पुरस्काराची भर पडली आहे. या पुरस्काराचा तो 18 वा मानकरी ठरला आहे. जगभरातील फूटबॉल चाहते या पुरस्कार विजेत्याची निवड करत असतात. फूटबॉलच्या इतिहासातील दरवर्षीच्या ग्रेटेस्ट खेळाडूसाठीचा हा मानाचा जीवन गौरव पुरस्कार असे या पुरस्काराच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हटले आहे.
2003 पासून दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. एका खेळाडूला केवळ एकदाच हा पुरस्कार मिळू शकतो. जगभरातील पत्रकार 10 खेळाडू शाॕर्टलिस्ट करतात आणि त्यातून आॉनलाईन पोलद्वारे पुरस्कार विजेत्याची निवड करण्यात येते. पुरस्कार विजेत्याला मोनॕको येथे समुद्रकिनारी आपल्या पायाचा ठसा साच्यामध्ये दावा लागतो.
यंदा या पुरस्कारासाठी रोनाल्डोच्या स्पर्धेत मोहम्मद सलाह, राॕबर्ट लेवांडोस्की व नेमार हे खेळाडू होते.
गोल्डन फूट पुरस्कार विजेते
2003- रॉबर्टो बॕजीयो
2004- पावेल नेदवेद
2005- आंद्रे शेवचंको
2006- रोनाल्डो नाझारियो
2007- अॕलेझांद्रो डेल पेरो
2008- राॕबर्टो कार्लोस
2009- रोनाल्डिन्हो
2010- फ्रान्सिस्को टोटी
2011- रायन गिग्ज
2012- झ्लाटन इब्राहिमोवीक
2013- दिदीयर द्रोग्बा
2014- आंद्रेस इनियेस्टा
2015- सॕम्युअल इटो
2016- गियानलुगी बुफॉन
2017- इकेर कॕसियास
2018- एडिन्सन कव्हानी
2019- ल्युका मोद्रीक
2020- ख्रिस्तियानो रोनाल्डो
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला