रोनाल्डो व मेस्सी चॅम्पियन्स लीगमध्ये प्रथमच साखळीत येणार आमने-सामने

Cristiano Ronaldo- Lionel Messi

ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi)…फूटबॉलचे हे दोन सुपरस्टार एकाच सामन्यात खेळले तर काय धमाल येईल…तर अशी धमाल चॅम्पियन्स लीग स्पर्धेत येणार आहे आणि नेहमीपेक्षा लवकरच येणार आहे कारण रोनाल्डोचा युवेंटस संघ आणि मेस्सीचा बार्सिलोना संघ साखळी फेरीतच लढणार आहेत आणि त्यामुळे रोनाल्डो व मेस्सी हे पहिल्यांदाच चॕम्पियन्स लीगच्या साखळीत आमने-सामने येणार आहेत. या दोघांच्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘जी’ गटात स्थान मिळाले आहे.

चॅम्पियन्स लीग विजेते बायर्न म्युनिकचा सामना अॕटलेटिको माद्रीदशी होईल. मॅचेस्टर युनायटेड व पॕरिस सेंट जर्मेन आणि आरबी लीपझीग हे एकाच गटात आहेत.

साखळी सामने 20 व 21आॕक्टोबरपासून होणार आहेत तर अंतिम सामना 29 मे रोजी इस्तांबूल येथे होणार आहे.

मेस्सी व रोनाल्डोची श्रेष्ठत्वाची स्पर्धा काही नवीन नाही. रोनाल्डो रियाल माद्रिदकडे होता तेंव्हा स्पॕनिश लीगमध्ये ते समोरासमोर यायचेच.आता ‘जी’ गटात युवेंटस व बार्सिलोनाशिवाय डायनॕमो किव्ह व फेरेंक्व्हारोस हे क्लब आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER