या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करून उदयास आला रोमान्स किंग शाहरुख खान

Shahrukh Khan

बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह आणि रोमान्स किंग असे म्हटले जाणारे शाहरुख खान (Shahrukh Khan) आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. किंग खानचे नाव जेव्हा जेव्हा आपल्या मनात येते तेव्हा आपल्याला शाहरुखची रोमँटिक शैली बर्‍याचदा आठवते. त्यांचे रोमँटिक संवाद आठवते. इंडस्ट्रीला रोमान्स शिकवणाऱ्या शाहरुखने बर्‍याच चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका देखील केल्या आहेत. आज किंग खानच्या वाढदिवशी अभिनेत्याच्या लोकप्रिय नकारात्मक पात्राविषयी जाणून घेऊया.

बाजीगर
१९९३ मध्ये शाहरुख पहिल्यांदाच ‘बाजीगर’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला. या चित्रपटात काजोल आणि शिल्पा शेट्टीसोबत शाहरुख होता.

डर
१९९३ मध्ये शाहरुखने ‘डर’ या दुसऱ्या चित्रपटातही नकारात्मक भूमिका साकारली होती. शाहरुखचा ‘आई लव यू क क किरन’ हा डायलॉग या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला.

अंजाम
शाहरुख पुन्हा ‘अंजाम’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटामध्ये शाहरुखच्या व्यक्तिरेखेला इतकी पसंती मिळाली होती की त्याला ‘बेस्ट फिल्म फेअर व्हिलन अवॉर्ड’ देण्यात आला होता.

राम जाने
१९९५ मध्ये ‘राम जाने’ या सिनेमातही शाहरुखने नकारात्मक भूमिका केली होती. या चित्रपटात शाहुरुखबरोबर जुही चावला मुख्य भूमिकेत होती.

डुप्लीकेट
‘डुप्लीकेट’ या चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका होती ज्यात त्याने नायक आणि खलनायक या दोघांचीही भूमिका केली होती. ‘डुप्लिकेट’ मध्ये शाहरुख सोबत जुही चावला आणि सोनाली बेंद्रे मुख्य भूमिकेत होत्या.

जोश
२००० मध्ये आलेल्या अ‍ॅक्शन ड्रामा फिल्म ‘जोश’ मध्ये किंग खानने ईगल गँगच्या लीडरची भूमिका साकारली होती. ही भूमिका देखील नकारात्मक होती.

डॉन
२००६ मध्ये शाहरुख ६ वर्षानंतर फरहान अख्तरच्या ‘डॉन’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER