नवी मुंबई महापालिका निवडणुसाठी काँग्रेसकडून स्वबळावर नारा, पटोलेंची घोषणा

nana patole

नवी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आज मोठा धक्का बसला. राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने मुंबईपाठोपाठ आत नवी मुंबई महापालिका (Mumbai mahanagar palika) निवडणूकही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज नवी मुंबईतील काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीला धक्का दिला.

यावेळी पटोले यांनी पक्षसंघटनेत असलेल्या अंतर्गत मतभेदावर कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या दिल्या. अंतर्गत मतभेद दूर करता आले नाहीत तर दुसऱ्याला संधी देण्यात येईल. पक्ष कोण्या एकट्याचा नसतो तर त्याची विचारधारा मानणाऱ्या सर्वांचा असतो, असे म्हणत त्यांनी थेट इशाराच देऊन टाकला. नवी मुंबई काँग्रेस ही कायम सत्ताधारी पार्टीबरोबर फरफटत चालते असा नेहमीच आरोप केला जातो. काही वर्षांपूर्वी राजकीय अज्ञातवासात गेलेले अनिल कौशिक यांना पुन्हा संधी देत काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदा मनपाच्या सत्तेत आली होती. मात्र सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात असून, काही दिवसापूर्वी अचानक चार प्रवक्त्यांना काढण्यात आले होते.

यावेळी पटोले म्हणाले, प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यातील सध्यस्थितीचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवावा लागतो. मात्र मी चार महिन्यात अहवाल पाठवला नाही. शहरात विविध कार्यक्रम घेतले जातात, त्याचे फोटो काढून अहवाल तयार केले जातात. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीत तुमच्या कामांचा रिझल्ट दिसणे गरजेचे आहे. इतकंच नाही तर नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांच्यापेक्षा चांगला व्यक्ती भेटला तर त्याला संधी देण्यात येईल, असंही नाना पटोले म्हणाले.

लोकांची कामे करा कोणाच्या घरात दुःखद घटना घडली तर त्याच्या घरी जाऊन भेट घ्या, सांत्वन करा. नवी मुंबई हे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या कल्पनेतून उतरली असून त्यांच्या तो उद्देश्य साध्य करण्यासाठी काँग्रेस सत्तेत असणे गरजेचे आहे, असं नाना पटोलेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं. यावेळी कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार मोहन जोशी, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, संतोष शेट्टी इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button