‘सर्कस’साठी संपूर्ण स्टुडियो बुक केला रोहित शेट्टीने

Ranveer Singh - Rohit Shetty

सिंबानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) रणवीर सिंहला (Ranveer Singh) घेऊन ‘सर्कस’ नावाचा चित्रपट तयार करीत असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होतीच. विल्यम शेक्सपियरच्या ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’वर आधारित असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह दुहेरी भूमिका साकारीत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रोहितने वांद्रे येथील मेहबूब स्टुडियोमधील सर्व फ्लोर बुक केल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे लवकरात लवकर शूटिंग पूर्ण व्हावे म्हणून त्याने अख्खा स्टुडियो बुक केल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटात रणवीर सिंहसोबत जॅकलीन फर्नांडिस आणि वरुण शर्माही दिसणार आहेत. रोहित शेट्टी चित्रपटाच्या शूटिंगला यशराज स्टुडियोमधून करणार आहे आणि त्यानंतर चित्रपटाचा बराचसा भाग मेहबूब स्टुडियोमध्ये शूट केला जाणार आहे. त्यानंतर रोहित शेट्टी आपल्या संपूर्ण टीमसह हैदराबाद येथील रामोजी राव फिल्मसिटीतील एका स्टुडियोत शूटिंग करणार आहे. त्यानंतर चित्रपटाचा शेवटचा भाग रोहितचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्यात केले जाणार आहे.

रोहितने यापूर्वी अमोल पालेकर यांच्या सुपरहिट ‘गोलमाल’वर आधारित ‘बोल बच्चन’ची निर्मिती केली होती. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन अभिनीत हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER