रोहित शर्माचा मुद्दा आला चर्चेत, BCCI ने विराट कोहली, रवि शास्त्री यांच्याशी केला संवाद: अहवाल

Virat Kohli-Ravi Shastri-Rohit Sharma-Sport News

वृत्तानुसार BCCI ने ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल केला आहे. यापूर्वी भारतीय कर्णधाराने रोहित शर्माविषयी (Rohit Sharma)विधान केले होते.

२९ नोव्हेंबर रोजी सिडनी येथे झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत त्याच्याशी कोणताही संवाद झाला नाही, किंवा याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही.

रोहित शर्माने IPL २०२० मध्ये भाग घेतला होता आणि मुंबई इंडियन्सला ५ वे विजेतेपद मिळवून दिले होते. या स्पर्धेत रोहित काही सामन्यांपासून दूर होता कारण त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, म्हणूनच या ‘हिटमन’चा ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या भारतीय वन डे आणि टी -२० संघात समावेश झाला नव्हता. IPL फ्रँचायझी आणि खेळाडूशी संवाद साधण्यात कमकुवत असल्याबद्दल BCCI ला टीकेचा सामना करावा लागला होता.

आता बातमी आली आहे की BCCI ने हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि रोहित शर्माच्या फिटनेसबाबत उपस्थित झालेल्या गैरसमजांविषयी मंडळाने व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल केला आहे. या बैठकीला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सदस्य (NCA) उपस्थित होते जे रोहित शर्माच्या तंदुरुस्तीचे निरीक्षण करतात. याशिवाय या बैठकीला मुख्य निवडक सुनील जोशीही उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार ११ डिसेंबर रोजी रोहित शर्माच्या फिटनेसबाबत अंतिम मूल्यांकन केले जाईल आणि त्याचदिवशी रोहित ऑस्ट्रेलियामध्ये जाईल की नाही याचा निर्णयही घेण्यात येईल. रोहित तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाला तरी अनेक त्रास कायम राहतील. ३१ डिसेंबरपर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा नाही.

जर रोहित शर्मा कसा तरी ऑस्ट्रेलिया गाठला तर नियमांनुसार त्याला १४ दिवस क्वारंटीन राहावे लागेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलल्यानंतर सौरव गांगुली क्वारंटीन ठेवण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. असे असूनही एडिलेड आणि मेलबर्न कसोटीत सामील होणे रोहितसाठी फार कठीण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER