नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, रोहित शर्मा यंदा पहिलाच

SRH vs MI

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारा पहिला कर्णधार ठरला आहे. शनिवारी हैदराबादविरुध्दच्या (SRH) सामन्यात त्याने नाणेफेक जिंकली आणि मुंबई इंडियन्स (MI) प्रथम फलंदाजी करेल असा निर्णय घेतला.

यंदाच्या आयपीएलमधील आधीच्या आठ सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारांनी प्रथम क्षेत्ररक्षणच पसंत केले होते. पहिल्या दोन सामन्यात तो निर्णय योग्यसुध्दा ठरला पण पुढचे चार सामने नाणेफेक जिंकलेल्या संघाने गमावले आणि मुंबईच्या शनिवारच्या सामन्याआधीचे दोन सामने पुन्हा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले.

यंदा आतापर्यंत नाणेफेक जिंकणारा संघ, त्यांची पसंती आणि सामन्याचा निकाल असा..
१) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर— क्षेत्ररक्षण— विजय
२) दिल्ली कॅपिटल्स——— क्षेत्ररक्षण— विजय
३) सनरायजर्स हैदराबाद —- क्षेत्ररक्षण— पराभव
४) राजस्थान रॉयल्स——— क्षेत्ररक्षण— पराभव
५) कोलकाता नाईट रायडर्स्– क्षेत्ररक्षण— पराभव
६) सनरायजर्स हैदराबाद —- क्षेत्ररक्षण— पराभव
७)राजस्थान रॉयल्स——— क्षेत्ररक्षण— विजय
८) चेन्नई सुपर किंग्ज ——— क्षेत्ररक्षण— विजय
९) मुंबई इंडियन्स ———— फलंदाजी— पराभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button