ऑस्ट्रेलियाविरुध्द ‘हे’ शतक करणारा रोहित शर्मा पहिलाच!

Rohit Sharma

रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघात परतलाय आणि त्याच्या नेहमीच्याच शैलीत खेळतोय म्हणजे षटकार (Sixes) लगावतोय. सिडनी (Sydney) कसोटीत त्याने नेथन लियानला षटकार लगावला आणि यासह ऑस्ट्रेलियाविरुध्द त्याने षटकारांचे शतक पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाविरुध्द इतर कोणताही फलंदाज 65 सुध्दा षटकार लगावू शकलेला नाही. दुसऱ्या स्थानावरील इयान माॕर्गनचे 63 तर ब्रेंडन मॕक्क्युलमचे 60 षटकार आहेत. भारतातर्फे रोहितनंतर सचिन तेंडूलकर व एम.एस. धोनी यांनी प्रत्येकी 60 षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुध्द 65 सामन्यात 2829 धावा करताना रोहितने हे षटकार लगावले आहेत. त्यात 44 षटकार ऑस्ट्रेलियात आहेत.

रोहितच्या ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या या 100 षटकारांमध्ये कसोटी सामन्यांतील केवळ 9 आणि टी-20 मधील 15 षटकार आहेत तर वन डे सामन्यांतील 76 षटकार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाविरुध्द षटकारांचे शतक पूर्ण करणारा रोहीत शर्मा हा केवळ दुसराच फलंदाज आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने इंग्लंडविरुध्द 130 षटकार लगावलेले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाविरुध्द सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

130 – ख्रिस गेल, वि. इंग्लड
100 – रोहित शर्मा, वि. ऑस्ट्रेलिया
87 – ख्रिस गेल, वि. न्यूझीलंड
86 – शाहिद आफ्रिदी, वि. श्रीलंका
78 – ब्रेंडन मॕक्क्युलम, वि.इंग्लड
76 – ग्लेन मॕक्सवेल, वि. भारत
75 – शाहिदआफ्रिदी, वि. भारत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER