India vs Australia 4th Test: रोहित शर्माने स्टीव्ह स्मिथचे केली कॉपी, चाहत्यांनीही लुटला आनंद; पहा व्हायरल व्हिडिओ

सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) कॉपी केली. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या शेवटच्या कसोटीच्या चौथ्या दिवशीही दोन्ही संघांमधील टक्कर कायम आहे. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाची बरोबरी साधून सामना जिंकण्याची आशा राखली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने दुसर्‍या डावात मोठे लक्ष्य ठेऊन, टीम इंडियाच्या अपेक्षांमध्ये बदल करायचा आहे. मात्र, भारतीय गोलंदाजांनी उत्तम खेळ करत कांगारुंवर खूप दबाव आणला.

रोहित शर्माची मजेदार शैली
सामन्याच्या चौथ्या दिवशी एक गमतीशीर घटना घडली. कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करीत होते. सामन्यात १ मिनिटांचा ब्रेक लागला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर उभे होते. तेव्हा रोहित शर्मा खेळपट्टीवर पोहोचला आणि फलंदाजाच्या जागी उभा राहिला. रोहितने फलंदाजीचा दिखावा केला आणि स्टीव्ह स्मिथची नक्कल केली. असे केल्यावर तो तेथून निघून गेला.

https://twitter.com/imDs45/status/1350994557337538561

थोड्या अंतरावर उभे राहून स्टीव्ह स्मिथचे लक्ष गेले आणि त्याने रोहितला हे करताना पाहिले.

रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहतेही त्याची खिल्ली उडवत आहेत.

सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. तिसर्‍या दिवशी शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरची भागीदारी भारतीय संघासाठी जीवनदान पेक्षा काही कमी सिद्ध झाली नाही. या दोन खेळाडूंच्या खेळीने टीम इंडियाने पहिल्या डावात ३३६धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER