न खेळताही रोहितचा झेंडा कायम

Rohit Sharma

रोहित शर्मा (Rohit Sharma) भलेही सध्या भारतीय संघात नसेल आणि तो वन डे इंटरनॅशनल (ODI) सामने खेळू शकत नसेल, पण न खेळताही त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो म्हणजे भारतासाठी वर्षातील सर्वोच्च खेळी आपल्या नावावर राखण्याचा.

गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी भारतातर्फे सर्वोच्च वन डे खेळी रोहितचीच राहिली आहे. यंदा तो केवळ तीनच वन डे इंटरनॕशनल खेळला मात्र तेवढ्यातच एक शतकी खेळी करुन त्याने आपला हा विक्रम अबाधित ठेवला आहे. यंदा जानेवारीत आॕस्ट्रेलियाविरुध्द बंगळुरुत त्याने 119 धावांची खेळी केली होती. ही भारतातर्फे वन डे सामन्यांमध्ये यंदाची सर्वोच्च खेळी ठरली आहे.

यावेळचं वेगळेपण हे की, या आठ वर्षात पहिल्यांदाच रोहीत वर्षाला दीडशेपेक्षा अधिक धावांची खेळी करु शकलेला नाही पण सर्वोच्च खेळी आपलीच राहिल हा विक्रम मात्र त्याने कायम ठेवला आहे. गेल्या आठ वर्षात त्याच्यापेक्षा मोठी वन डे खेळी इतर कोणताही भारतीय फलंदाज करु शकलेला नाही.

गेल्या 10 वर्षातील भारतातर्फे सर्वोच्च वन डे खेळी
2011- विरेंद्र सेहवाग- 219 – वि. वेस्ट इंडीज
2012- विराट कोहली – 183 – वि. पाकिस्तान
2013- रोहित शर्मा – 209 – वि. आॕस्ट्रेलिया
2014- रोहीत शर्मा – 264 – वि. श्रीलंका
2015- रोहीत शर्मा – 250 – वि. दक्षिण आफ्रिका
2016- रोहीत शर्मा – 171 – वि. आॕस्ट्रेलिया
2017- रोहीत शर्मा – 208 – वि. श्रीलंका
2018- रोहीत शर्मा – 162 – वि. वेस्ट इंडीज
2019- रोहीत शर्मा – 159 – वि. वेस्ट इंडीज
2020- रोहित शर्मा – 119 वि. आॕस्ट्रेलिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER